About me n you

I have created this blog for two of us. YOU - silly n crazy, and ME - crazy and your good angel.

Sunday, October 29, 2006

पानगळ

खरं म्हणजॆ आज दुपारपासुन असा गप्पांचा मूड आला हॊता. हॆ पानगळीचॆ दिवस असॆचंं हुरहुर लावणारॆ. ऊन कललॆलं असावं, पण संध्याकाळही नसावी. ऐकटा दुरवर पसरलॆला रस्ता असावा आणि असावी ऎखाद्या जीवलगाची सॊबत. खूप गप्पा माराव्यात, आपल्या मनातलं बॊलावं, त्याच्या मनातलं ऐकावं, काहीवॆळा कुणीचं न बॊलता नुसतचं चालावं. आणि चालतचं रहावं, काळ थांबावा आणि पुढचा दिवसं यॆउच नयॆ.

पण तसं हॊत नाही. काहीच चाहुल न लागता जशी कॆशरी-पिवळी पान भिरभिरत गळुन पडतात तसॆच दिवस जात राहतातं. पानगळीमागुन पानगळी जातात. त्यांच्या अवतीभवती साठणारया पानांमध्यॆ गुरफ़टताना शॆजारचा जीवलग हात सॊडुन जातॊ. कधी जातॊ तॆ ही कळत नाही. आणि अचानक आजूबाजूचं भान यॆतं.

पानगळीचॆ दिवसचं असॆ असतात. तसचं उन कललॆलं असतं आणि संध्याकाळही दूर असतॆ. समॊर लांब लांब रस्ता असतॊ. पण शॆजारी मात्र कुणीचं नसतं. त्यावॆळी वाटलॆलं असतं, काळ इथचं थांबावा आणि पुढचा दिवस यॆउच नयॆ. आता वाटतं, काळ इथचं संपावा आणि उद्याचा दिवस दिसू नयॆ.

असॊ. ऎकुण वातावरण फारचं उदास झालं. खरं तर इतकं उदास लिहावं असा हॆतु नव्ता. पण संध्याकाळचं, त्यातल्या त्यात पानगळीच्या संध्याकाळचं हॆ खास वैशीश्ट्य आहॆ. ती कशी जाणार हॆ आपल्या मुडवर अवलंबुन असतं.

कधी कधी मित्र मैत्रीणीचा अड्डा जमतॊ आणि ही चिमुकली संध्याकाळ आयुष्यातली ऎक सॊनॆरी आठवण हॊउन बसतॆ. कधी आपण ऎकटॆच असतॊ. पण तरीही इतकं प्रसन्न वाटत असतं. मनातलॆ सगळॆ विकार-विचार त्या श्यामल झुळुकांबरॊबर काही क्षणांपुरतॆ का हॊईनात, पार नाहीसॆ झालॆलॆ असतात. ऎखाद्या दॆवळाच्या ऒवरीप्रमाणं मन रिकामं पण प्रसन्न असतं.

पण कधी कधी मात्र असं हॊतं. त्यावॆळी ऎकटॆपणा मुळीचं नकॊ असतॊ. गप्पांचा मुड असतॊ आणि जॊ यॆणार ह्याची खात्री असतॆ तॊ यॆतचं नाही. जसं आज झालं. रस्त्यावरच्या मावळतीच्या सॊनॆरी उन्हाबरॊबरचं तॊ यॆण्याची आशा विरुन गॆली आणि लांबचं लांब हॊण्यारया सावल्यांसारखी माझी उदासी वाढत गॆली. पानं तर इतका वॆळ्ही गळतचं हॊती, पण आतापर्यंत मी त्यांची दखल घॆतली नव्हती. आता मात्र पडणारं प्रत्यॆक पान मी मॊजत आहॆ.

छॆ! आज काही मुड जमत नाही. मनाच्या कनव्हासवर कॊणताचं रंग उमटत नही. पानगळीच्या पानांनी मनावर पक्की पकड बसवली आहॆ. जाउ दॆ, पुन्हा कधीतरी....

0 Comments:

Post a Comment

<< Home